केसांचे विकार आणि सुवर्ण रसायन आयुर्वेद चिकित्सा

केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पोटाचे आरोग्य चांगले राहणे फार गरजेचे असते

कडकडीत भूक लागणे, पोट व्यवस्थित साफ होणे यासारख्या साध्या मूलभूत गोष्टी शरीराच्या व्यवस्थित चालू असतील तर पोटाची अवस्था व्यवस्थित राहते आणि पर्यायाने आपल्या शरीरातील सप्त धातु आहेत, (रस रक्त मांस मेद अस्थी मज्जा आणि शुक्र) हे चांगले राहतात.

आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार केसांची निर्मिती ही अस्थी धातू पासून म्हणजेच हाडांपासून होते. त्यामुळे ज्याच्या शरीरामधील हाडांची पोषकता चांगली असेल त्यांच्या शरिरामध्ये केसांचे आरोग्य सुदृढ राहते.. परंतु हेच जर एखाद्या पेशंटमध्ये पचनसंस्था व्यवस्थित काम करत नसेल तर त्याचा परिणाम हाडांवरती होतो.. शरीरातील कॅल्शियम गंधक त्याचप्रमाणे इतर न्यूट्रिशनल व्हॅल्यूज कमी व्हायला सुरुवात होते आणि पर्यायाने केसांचे आरोग्य बिघडते…

तरी केसांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आपली पचनसंस्था चांगली ठेवणे फार गरजेचे आहे.

आपल्या केसांच्या विकारांचा संदर्भामध्ये, त्याच्या वेगवेगळ्या कारणांचा आणि लक्षणांचा विचार करून आम्ही “केश संजीवनी कॉम्बो पॅक” मध्ये खालील औषधांचा अंतर्भाव केलेला आहे.

१)केश कल्प रसायन
केसांचे पोषण हे प्रामुख्याने शरीरातील लोह ,गंधक ,कॅल्शियम यासारख्या पदार्थावर अवलंबून असल्यामुळे आमच्या या केशकल्प रसायन या गोळ्यांमध्ये सल्फर लोह कॅल्शियम आवळा तसेच इतर अनेक आयुर्वेदिक उपयोगी वनस्पतींचा वापर केलेला आहे. यामधील एक एक गोळी सकाळ-संध्याकाळ उपाशीपोटी पाण्याबरोबर पोटातून घेतल्यास पित्ताचे तसेच पचनाचे त्रास तर कमी होतातच त्यासोबतच मूळ म्हणजे केसांमधील दोष दूर होऊन केस गळणे, केस पिकणे, कोंडा होणे, चाई पडणे यासारख्या केसांच्या आजारांचे मूळ कारणे दूर होऊन केसांची वाढ चांगली होते.केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होऊन नवीन काळेभोर केस तयार होण्यास सुरुवात होते.

२)केशारोग्य प्राश
यामध्ये आवळा पिंपळी माका जेष्ठमध मण्डुरभस्म कांतलोहभस्म प्रवाळभस्म स्वर्ण भस्म यांसारख्या केसांच्या आजारांवर उपयोगी अशा वनस्पतींचा वापर करून हे एक च्यवणप्राश सारखे गोड चवीचे औषध तयार केलेले आहे. हे औषध सकाळ-संध्याकाळ एक एक चमचा चघळून खाल्ल्यास केसांना गरजेचे असलेले विटामिन सी गंधक व लोह हे योग्य मात्रेमध्ये मिळून केसांचे आजार बरे होण्यास लवकर मदत होते.

३)केश संशोधन वटी
शास्त्राप्रमाणे केसांचे विकार होण्याच्या पाठीमागे शरीरातील वात पित्त हे दोष बिघडलेले असतात. शरिरातुन त्यांचे संशोधन होणे गरजेचे असते. यासाठी अजमोदा हिरडा आवळा ज्येष्ठमध यांसारख्या वनस्पतींचा वापर करून हे औषध तयार करण्यात आलेले आहे. याच्या दोन गोळ्या रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घेतल्यास शहरातील पित्त स्वरूपातील अतिरिक्त विषारांचा निचरा होऊन शरीराचे संशोधन होते व केसांचे आरोग्य सुधारते.

४)केश समृद्धी नस्य
केसांचे विकार हा प्रामुख्याने शरीराच्या वरच्या भागात असल्यामुळे उपचार करत असताना नाकावाटे दिलेले औषध हे शिर स्थानातील दोष दूर करून केसांच्या मुळाशी असलेले विविध प्रकारचे दोष शरीराच्या बाहेर काढून टाकते व केसांची मुळे घट्ट करते. त्याचप्रमाणे केसांच्या मुळांना स्निग्धता करून केस पांढरे होणे केस गळणे चाई पडणे केसांमध्ये कोंडा होणे यामध्ये खूपच उपयोगी पडते. औषधाचे 5 – 5 थेंब सकाळ-संध्याकाळ दोन्ही नाकपूड्यांमध्ये टाकून पाच दहा मिनिटे झोपून राहणे अपेक्षित आहे.

५)केशरंजन तेल
या तेलामध्ये पिकलेले केस काळे करण्यासाठी तसेच नवीन काळे केस येण्यासाठी उपयोग असले आयुर्वेदातील ब्राह्मी भृंगराज आवळा मंडुर भस्म कांतलोह भस्म जास्वंदीची फुले इत्यादी औषधांचा वापर करून हे तेल बनविण्यात आलेले आहे. याचा दररोज नित्यनेमाने केसांच्या मुळाशी लावण्यासाठी वापर केल्यास केस गळणे थांबते पण त्याचबरोबर पिकलेले केस काळे होण्यासाठी मदत होते.

६)केश दारूणक तेल
यामध्ये धोत्रा जास्वंद कडूनिंब माका यासारख्या या वनस्पतींचा वापर करून केसांमध्ये कोंडा होण्याचे प्रमाण व तो पूर्णतः बंद होण्यासाठी च्या निमित्त आयुर्वेदातील वनस्पतींचा वापर केलेला आहे. दररोज रात्री झोपताना केसांच्या मुळाशी हे तेल लावल्यास केसातील कोंडा पूर्णपणे बंद होऊन केस गळणे थांबते.

७)सुकेशा तेल
यामध्ये आवळा जास्वंद मेथी मंडूर भस्म ज्येष्ठमध त्याचप्रमाणे इतर औषधी वनस्पतींचा वापर करून केस काळे भोर व लांब सडक होण्यासाठी व दररोजच्या वापराच्या साठी या तेलाचे निर्माण केलेले आहे.याचा वापर दररोज सकाळी आंघोळ केल्यानंतर तसेच रात्री झोपताना केसांच्या मुळाशी लावल्यास केसांचे आरोग्य चांगले राहते व केस सुदृढ होतात.

वरील केश संजीवनी कॉम्बो पॅक मधील सर्व औषधांची रचना ही केसांच्या विकारांचा व त्याच्या लक्षणांचा व कारणांचा विचार करून तयार केलेले असल्यामुळे कोणत्याही एका औषधाचा वापर केल्यास उपयोग होईलच असे नाही. परंतु त्यातील सर्व औषधांचा एकत्रपणे वापर केल्यास मात्र *केस गळणे, चाई पडणे,केस पिकणे,केस दुभंगणे, कोंडा होणे यासारख्या केसांच्या विकारांमध्ये खूपच चांगला परिणाम दिसून आलेला आहे. या संदर्भामध्ये मागील पंधरा वर्षापासून केलेल्या संशोधनामधून तयार झालेल्या औषधांचा वापर केल्या गेलेला आहे.

धन्यवाद

आमच्या शाखा-
कामोठे (नवी मुंबई)-दररोज
दादर(मुंबई)- प्रत्येक शनिवारी सकाळी
पुणे(सदाशिव पेठ)- महिन्याच्या पहिल्या रविवारी
कोल्हापूर-महिन्याच्या तिस-या मंगळवारी

डॉ. नितीन थोरात
MD(Ayu)

श्री विश्वतेज आयुर्वेद चिकित्सालय प्रा लि.
शाॅप नं.5,शिव आरती सोसा. प्लॉट नं.78, सेक्टर 12, कृष्णा हॉटेल जवळ, कामोठे ,नवी मुंबई- 410 209 .
वेळ -स.10 ते 1 – सायं.6 ते 9.
मोबा.9867980769/9594303304

आनंदी रहा – निरोगी रहा

Website: suvarnarasayan.com
Youtube: bit.ly/2HBaaqC
Facebook: https://www.facebook.com/suvarnarasayan