मुतखडा व मुत्रपिंड विकार आणि आयुर्वेदिक उपचार, लक्षणे
मुत्रपिंड (Kidney) – संस्कृतमध्ये “वृक्क” हा शरिरातील एक महत्वाचा अवयव आहे. आयुर्वेद विचारानुसार मुत्रपिंड हे शरिरातील महत्वाचे मर्मस्थान असुन मेदोवह स्रोतसाचे मुलस्थान आहे. त्याची गर्भावस्थेत निर्मिती ही …“कफमेदःप्रसादात् वृक्कौ !!” अशी सांगितलेली आहे. कफ दोष व मेद धातु या दोघांच्या प्रसादाने म्हणजेच पोषणतत्वाने मुत्रपिंडाची उत्पत्ती होते. परिणामी मुत्रपिंड्विकारांचा विचार तसेच उपचार करत असताना या दोन घटकांचा विचार केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.
सध्याच्या मान्यताप्राप्त संशोधनानुसार मुत्रपिंडाचे काम हे रक्तामधील क्षारांचे गाळप करुन त्या क्षारांना शरिराच्या बाहेर काढुन टाकुन शरीरातील पाण्याचे व क्षारांचे संतुलन राखणे हे होय. त्यानुसार Calcium,Sodium ,Urea,Uric Acid,Creatinin इ.शरिरातील क्षारिय घटकांचे अतिरिक्त मात्रेचे वहन करुन ते मुत्रावाटे बाहेर काढुन टाकण्याचे महत्वाचे मुत्रपिंड करत असते. अन्यथा हे क्षारिय पदार्थ अतिरिक्त मात्रेत साठुन राहिल्यास विषाप्रमाणे कार्य करुन संपुर्ण शरिरावर सुज ,रक्तदाब वृद्धी ,ह्रदयाचे विकार,मुतखडा, मुत्रावाटे रक्त जाणे व पर्यायाने Kidney Failure होउन अंतिमतः रुग्णाच्या जीवाला घातक लक्षणे निर्माण होणे असे दुष्परिणाम होतात.
मुत्रपिंड्विकारांमुळे यकृत व प्लिहा या शरिरातील इतर अवयवांवर अनावश्यक ताण येउन मधुमेह आजार, वजन वाढणे,चरबी वाढणे, stricture Urethra, Burning Urination (लघवीला जळजळ), रक्तामधील हिमोग्लोबीन कमी होणे, उष्णतेचे आजार निर्माण होणे, त्वचा विकार निर्माण होणे, ह्रदयाला सुज येणे, दमा व श्वसनाचे विकार होणे ,धाप लागणे, रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, पचनसंस्था विकृती निर्माण होणे इ. अनेकानेक आजारांची निर्मिती शरिरात होते.
आयुर्वेदामध्ये या सर्व बाबींचा सखोल विचार करुन आजाराची निर्माण प्रक्रिया जाणुन घेऊन त्यावर उपचार सांगितलेले आहेत. शरिरातील पचनव्यापार , excretory system यांचा सुयोग्य समन्वय साधुन योग्य आहार पद्धती, वमन विरेचनादी पंचकर्मांचा सुयोग्य वापर व आयुर्वेदोक्त औषधांचा वापर या त्रिसुत्रीद्वारे मुत्रपिंडविकारावर उपचार करून ते पुन्हा होउ नयेत म्हणुनही व्यवस्थापन केले जाते.
आयुर्वेदोक्त पद्धतीने या सर्व विकृतींचे निदान करुन वरील आहार , पंचकर्म व औषधोपचार या त्रिसुत्रीचा उपयोग केल्यास कोणत्याही प्रकारच्या Dialysis , Kidney transplant , Lithotripsy यासारख्या शस्त्रक्रीयांपासुन व पर्यायाने होणा-या आर्थिक व शारिरिक नुकसानीपासुन मुक्ती मिळवता येऊ शकते.
“निरोगी रहा – आनंदी रहा”.
वैद्य नितिन थोरात MD(Ayu)
Mob.9867980769
www.suvarnarasayan.com